बारामतीत जमीन खरेदीत शेतकऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक.
भावाभावात शेतजमिनीच्या हद्दीपायी बेदम हाणामारी.
एकाने शेतकऱ्याची 7 एकर जमीन शिताफीने लुबाडली
5 points to check before buying agricultural land in maharashtra :- अशा एक ना अनेक बातम्या आपण रोज वाचत असतो, ऐकत असतो. तर मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की, मूळ जमिनीचा मालक वेगळाच असतो आणि बनावट कागदपत्रे करून दुसऱ्याच कोणाकडून तरी जमिनीचे व्यवहार होतात आणि मग वेळ निघून गेल्यावर ते लक्षात येते.
तसेच जमिनीवर कर्ज काढून खोटी कागदपत्रे तयार करून देखील जमिनीची विक्री केली जाते, तर अशावेळी कोणती दक्षता घेतली पाहिजे? चला तर पाहूया…,
1. सातबारा उतारा तपासा
सातबारा उतारा हा जमिनीचा अधिकृत दस्तावेज असतो. यावर जमिनीचे क्षेत्रफळ, मालकाचे नाव, जमिनीचा प्रकार, कर्जाचा बोजा, न्यायालयीन खटल्याची नोंद इत्यादी माहिती असते.
त्यामुळे सातबारा उतारा तपासून घेतल्यास, जमिनीशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्याची माहिती मिळू शकते. सातबारा उतारा तहसील कार्यालयातून किंवा तलाठ्याकडून मिळू शकतो.
2. भूधारणा पद्धत तपासा
महाराष्ट्रात भूधारणा पद्धतीनुसार जमिनीचे वर्गीकरण केले जाते. भोगवटादार वर्ग-1 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करण्यात कोणतेही निर्बंध नसतात.
मात्र, भोगवटादार वर्ग-2 मध्ये येणाऱ्या जमिनीची खरेदी-विक्री करताना सरकारी अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. भूधारणा पद्धत तहसील कार्यालयातून तपासून घेता येते.
3. शेतजमीनचा मूळ मालक कोण आहे हे तपासा
शेतजमीन विकत घेताना त्या जमिनीचा मूळ मालक कोण आहे हे तपासणे आवश्यक आहे. अन्यथा, जमिनीची खरेदी केल्यानंतर मूळ मालकाकडून वाद होऊ शकतो. जमिनीचा मूळ मालक कोण हे सातबारा उतारावरून तपासून घेता येते.
4. जमिनीचा खरेदी-विक्री करार नोंदणी करा
शेतजमिनीची खरेदी-विक्री करार नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत करारामुळे, भविष्यात कोणत्याही वादात, कराराची नोंदणी हा महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. जमिनीच्या खरेदी-विक्री करारासाठी वकीलाचा सल्ला घेणे चांगले.
5. वकीलचा सल्ला घ्या –
शेतजमीन विकत घेताना वकीलचा सल्ला घेणे देखील चांगले. वकील तुम्हाला जमिनीशी संबंधित सर्व कायदेशीर बाबींची माहिती देऊ शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही वाद असल्यास, त्या बाबतीत वकीलाचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.
वरील गोष्टींची काळजी घेतल्यास, शेतजमीन विकत घेताना फसवणूक होण्याची शक्यता कमी होऊ शकते.