10वी, 12वी पाससाठी नोकरी : सीमा रस्ते संघटना अंतर्गत 466 पदांची भरती; पगार 93 हजार मिळेल, इथे करा अर्ज | BRO Bharti 2024

BRO Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, सीमा रस्ते संघटना BRO (Border Roads Organization) अंतर्गत “चालक यांत्रिक वाहतूक, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर” पदांच्या एकूण 466 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️

भरती विभाग : BRO सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदासाठीची भरती होत आहे.

पदाचे नाव : ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर, पर्यवेक्षक, मशिनिस्ट, ऑपरेटर उत्खनन, यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर, या विविध पदासाठीची भरती ही निघालेली आहेत.

पद संख्या : एकूण रिक्त 466 जागांसाठी ही भरती होत आहे.

पद क्रमांकपदाचे नावपदसंख्या
01.ड्राफ्ट्समन16
02.सुपरवायझर (Administration)02
03.टर्नर10
04.मशिनिस्ट01
05.ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट (OG)417
06.ड्रायव्हर (रोड रोलर)02
07.ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन18
BRO Bharti 2024एकूण रिक्त जागा466 जागा

शैक्षणिक पात्रता : वरील पदासाठी बीआरओ अंतर्गत 466 पदांमध्ये ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनिस्ट, ऑपरेटर उत्खनन यंत्रसामग्री, ड्रायव्हर रोड रोलर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही 10वी, 12वी, पदवीधर, इतर व डिप्लोमा धारक अर्ज करू शकतात.

वरील पदासाठी अर्ज करण्यापूर्वी एकदा शैक्षणिक पात्रता नक्की तपासावी तसेच शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे त्यामुळे खाली दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात डाउनलोड करावी आणि आपण ज्या पदासाठी अर्ज करणार आहोत त्या पदाची शैक्षणिक पात्रता तपासावी.

वयोमर्यादा : वरील पदासाठी अर्ज करू इच्छित असाल तर यासाठी वयोमर्यादा ही ठरवून दिलेली यात 18 वर्षे ते 27 वर्षे, इतर प्रवर्गातील असाल तर त्या ठिकाणी सूट मिळू शकते (अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा)

अर्ज शुल्क : पाहायला गेलं तर BRO अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी सर्वसाधारण, ओबीसी, इतर सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क 100 रुपये लागणार आहे.

पगार :- 29,800 ते 93,000 वेतन मिळणार आहे.

मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज नमुनायेथे क्लिक करा

BRO सीमा रस्ते संघटना भरती 2024 निवड प्रकिया

  • प्रॅक्टिकल टेस्ट
  • प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

अर्ज पद्धती – ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या संबंधित पत्त्यावरती सादर करायचा आहे.

अर्ज कसा पाठवायचा? वरील पदांसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. अर्जाची पीडीएफ खाली दिलेली आहे ती पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही तो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसोबत खाली दिलेल्या संबंधित पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी ऑफलाईन पद्धतीने पाठवू शकता.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015. या पत्त्यावर आपला अर्ज पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
फी भरण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळmarvels.bro.gov.in
सीमा रस्ते संघटना

How To Apply For Border Roads Organization Jobs 2024

  • या भरती साठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फक्त इंग्रजी/हिंदीमध्ये भरला जाईल.
  • कोणताही उमेदवार एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवणार नाही.
  • फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांनी अर्ज करण्याची गरज नाही.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलला असावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.