Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 ;- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात विविध पदांच्या 236 जागांसाठी 2024 मध्ये भरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरतीची अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 नोव्हेंबर 2024 असणार आहे, तरी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात भरती – Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट ड या संवर्गातील (१) संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित) २ पदे (२) परिविक्षा अधिकारी, गट क ७२ पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी) गट क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क-२ पदे (५) वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क- ५६ पदे (६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क५७ पदे (७) वरिष्ठ काळजी वाहक गट-ड ४ पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक गट-ड ३६ पदे (९) स्वयंपाकी गट-ड-६ इत्यादी भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सरळसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग सरळसेवा भरती (Mahila Bal Vikas Vibhag Bharti) प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या संकेतस्थळावर दिनांक १४-१०-२०२४ पासून उपलब्ध होणाऱ्या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ उक्त संकेस्थळावरुन ऑनलाइन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/ परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाही.
एकूण जागा : 236 जागा
पदाचे नाव व तपशील : खाली सविस्तर वाचा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | संरक्षण अधिकारी, गट ब | 02 |
2 | परिविक्षा अधिकारी, गट क | 72 |
3 | लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क | 01 |
4 | लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क | 02 |
5 | वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहायक, गट-क | 56 |
6 | संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क | 57 |
7 | वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 04 |
8 | कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड | 36 |
9 | स्वयंपाकी गट-ड | 06 |
Total | 236 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: (i) समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.5: कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
- पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
अर्ज पद्धती – ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात सूचना : जाहिरात सूचना पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा. (14 ऑक्टोबर 2024 रोजी ऑनलाईन लिंक उपलब्ध होईल.)
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.
How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2024
- इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.
- त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.