BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया..,

Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार, महाराष्ट्र सरकारी नोकरीसाठी इच्छुकांसाठी मोठी बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने एक्झिक्युटिव्ह असिस्टंट/ कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. BMC ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 1846 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे..,

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या संवर्गातील खालील तक्त्यात नमूद केलेली 1846 रिक्त पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.

सदर पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रस्तृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने (BMC Bharti) अर्ज मागविण्यात येत असून, त्यासाठी उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कार्यकारी सहायक (पूर्वीचे पदनामः लिपिक) पदाकरिता ऑनलाईन अर्ज’ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

“कार्यकारी सहायक” (पूर्वीचे पदनामः लिपिक) या पदासाठी ऑनलाइन पद्धतीने (BMC Bharti) अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयाची आहे की, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️


भरती प्रकार व विभाग : ही एक सरकारी नोकर भरती आहे व बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत कार्यकारी सहायक (लिपिक) या पदासाठी ही भरती राबवली जात आहे.

पदाचे नाव : कार्यकारी सहायक (लिपिक) / Executive Assistant (Clerical)

पदसंख्या : एकूण 1846 जागा

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर दिलेला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी सहायक (लिपिक)1846
एकूण1846

शैक्षणिक पात्रता : (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी  (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

– उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.

– उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा त्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.

– उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी 38 वर्षांपेक्षा जास्त असू नये. राखीव वर्गातील उमेदवारांना 18 वर्षे ते 43 वर्षेजास्तीच्या वयोमर्यादेत सुट देण्यात आली आहे.

नोकरी ठिकाण: मुंबई (महाराष्ट्र)

फी : उमेदवारांनी नोंद घ्यावी की या भरतीसाठी अर्ज करताना, उमेदवारांना विहित शुल्क 1000 रुपये ऑनलाइन माध्यमातून भरावे लागतील. राखीव वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क फक्त 900 रुपये आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2024 रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्ज करता येतील. पालिकेच्या वेबसाइटवर या भरतीबाबत सविस्तर जाहिरात देण्यात आली आहे. 

परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.


जाहिरात (BMC Bharti PDF): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online BMC Job): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.


How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Mega Bharti 2024अर्ज कुठे आणि कसा करायचा?
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार BMC च्या अधिकृत वेबसाइट portal.mcgm.gov.in वरील भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकला भेट देऊन किंवा अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेअंतर्गत, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून, उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील. मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार 9 सप्टेंबरच्या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतील.

वरील BMC Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी मेगा भरती हा लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

Leave a Comment