Jobs in Google 2024 : सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला गुगलमध्ये इंटर्नशिपची संधी, लाखों रुपयांचा स्टायपेंड मिळणार, अर्ज कुठं करायचा?

Internship in Google 2024 : नमस्कार मित्रांनो, गुगलमध्ये इटर्नशिप करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवार  विंटर इंटर्नशिप प्रोग्राम 2025 साठी अर्ज करु शकतात. 

Jobs in Google 2024 :- गुगलमध्ये नोकरी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. गुगलनं सध्या विंटर इंटर्नशिप प्रोग्राम जानेवारी 2025 सुरु करण्याचा निर्णय़ घेतला आहे. तुम्ही या संधीचा फायदा घेण्यासाठी गुगलच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकता. तुम्ही या इंटर्नशिप प्रोग्रामद्वारे अनुभव मिळवू शकता, तुमची कामगिरी चांगली असल्यास गुगलमध्ये नोकरीची संधी देखील मिळू शकते. 

गुगलच्या वेबसाईटवरील माहितीनुसार गुगल विंटर इंटर्नशिप प्रोग्राम जानेवारी 2025 मध्ये सुरु होईल. ती 22-24 आठवडे सुरु राहील. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षात संगणक विज्ञान शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल इंटर्नशिपमध्ये अर्ज दाल करता येईल. 

कोण अर्ज करु शकतं?

संगणक विज्ञान या विषयात असोसिएट, बॅचलर्स आणि मास्टर्स डिग्री अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला असावा. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील ट्रेनिंग आणि अनुभव असावा.C,C++, JavaScript, Python या किंवा अन्य प्रोग्रामिंग लँग्वेंजमध्ये कोडिंगचा अनुभव असावा.          

वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, Unix/ Liux मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, डिस्ट्रिब्युटेड आणि पॅरलल सिस्टीम्स, मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन रिट्रीवल, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर सिस्टीम डेव्हलप करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदमचा अनुभव असावा. किमान 6 महिने पूर्णवेळ काम करण्यासाठी उपलब्ध असणं  आवश्यक आहे.  इंग्रजी भाषेत संवाद साधता यायला हवा. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

गुगल इंटर्नला किती सॅलरी मिळते?

गुगलमध्ये इटर्नला लाखो रुपये मिळतात. तिथं इंटर्नशिप करणाऱ्यांना 60 ते 70 हजार रुपये दरमहा दिले जातात. गुगलमध्ये पगार तुमच्या विभागावर आणि वर्क प्रोफाइलवर अवलंबून असतो. ग्लासडोर वरील माहितीनुसार गुगलमध्ये इंटर्नशिप करणाऱ्यांना 10.6 लाख ते 16.8 लाखांचं पॅकेज असतं. 

गुगल इंटर्नशि अॅप्लिकेशन प्रोसेस सुरु करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यापूर्वी  तुम्हाला तुमचा रिझ्यूम अपडेट करावा लागेल. रिझ्यूमसोबत कवर लेटर देखील असणं आवश्यक आहे. गुगल इंटर्नशिपसाठी अर्ज करताना जी कागदपत्रं मागितली जातील ती पीडीएफ स्वरुपात जमा करावीत. 

गगल करिअर्समध्ये तुमच्या सीव्ही किंवा रिझ्यूम अपलोड करा. कोडिंग संदर्भातील कोणता अभ्यासक्रम केला असेल तर त्याबाबतची माहिती भरा. उच्च शिक्षणा संदर्भातील सर्व माहिती भरा. तुम्ही शिक्षण घेत असाल तर शिक्षण सुरु असल्याबाबत माहिती लिहा. गुगलची कार्यालयं कर्नाटक आणि हैदराबादमध्ये आहेत. त्यासाठी बंगळुरु आणि हैदराबादमध्ये काम करावं लागेल. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा