लाडकी बहीण योजना अपात्रात यादी जाहीर : या महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार; इथे लगेच अर्जाची स्थिती पहा, नाहीतर….,

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi 2024 :- सर्वांना नमस्कार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी काही महिलांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत; तर काही महिलांनी वार्षिक उत्पन्न जास्त असतानाही अर्ज दाखल करून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे अशा पद्धतीनं मिळवलेले पैसे महिलांकडून सरकार परत घेणार का? किंवा त्यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

लाडकी बहीण योजनेची अपात्रता खालील प्रमाणे आहे, त्यामुळे अशा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेऊन शकते.

Ladki Bahin Yojana Apatrata Yadi
Ladki Bahin Yojana Apatrata Yadi

लाडकी बहीण योजना अपात्रता यादी जाहीर | Ladki Bahin Yojana Apatrata

(१) ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(२) ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात. तथापि रु. २.५० लाख पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.

(४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे दरमहा रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द (Ladki Bahin Yojana Apatrata) होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

📢 ही माहिती तर नक्की वाचा :- खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,

(६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

(७) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत; अशा महिलांचे लाडकी बहीण योजनेचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन पैसे पुन्हा घेतले जाऊ शकतात.

सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता (Ladki Bahin Yojana Apatrata)” निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेवून शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

📢 ही माहिती पण नक्की वाचा :- लाडकी बहिण योजना सरकारचा मोठा निर्णय : आत्ता 2100 रुपये मिळणार, पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल, इथे पहा तुम्हाला मिळेल का पैसे..,

अर्जाची अपात्रता स्थिती काय आहे ? ऑनलाईन चेक करा – Ladki Bahin Yojana Apatrata Status:

लाभार्थी महिलेने शासनाच्या संजय गांधी योजनेचा लाभ भेटत असेल तर आता आधार कार्ड नंबरने डेटा फिल्टर करून पोर्टल वर अशा दोन्ही लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज (Ladki Bahin Yojana Apatrata) रद्द होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेऊन शकते.

आपल्या अर्जाची अपात्रता स्थिती पाहण्यासाठी खालील पोर्टलला भेट देऊन लॉगिन करा.

मुख्य मेनू मध्ये “यापूर्वी केलेले अर्ज” वर क्लिक करा व Applcation Status च्या पुढे “Sanjay Gandhi” कॉलम मध्ये Yes असे अपडेट दिसत आहे.

Ladki Bahin Yojana Applcation Status (Ladki Bahin Yojana Apatrata)
Applcation Status

🔔 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या बँक मध्ये आले ते पहा ! Ladki Bahin Yojana Transaction History:

अनेक महिलांना योजनेचे पैसे आले आहेत तर काहींचा अर्ज मंजूर होऊन पैसे कोणत्या बँक मध्ये आलेत ते माहित नाही, आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का ते देखील तपासून पहावे किंवा खालील लिंक वर भेट देऊन लॉगिन करा.

मुख्य मेनू मध्ये “यापूर्वी केलेले अर्ज” वर क्लिक करा व Actions कॉलम मध्ये “Application Transaction History” आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.

Application Transaction History
Application Transaction History

आता तुम्ही “Application Transaction History” मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक मध्ये आले ते पहा !

🔔 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा