खुशखबर..! गो ग्रीन महावीतरण योजनेत आजच नोंदणी करा; प्रत्येक लाईट बिल मध्ये 10 रुपये वाचवा, मोबाईलवरून 5 मिनिटांत अशी करा नोंदणी..,

Go Green Mahavitaran Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो, नागरिकांसाठी आनंदाची बातमी आता प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत/सुट मिळणार आहे. प्रत्येक वीज बिल मध्ये १० रुपये सवलत मिळविण्यासाठी नागरिकांना गो-ग्रीन योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.

Maharashtra State Electricity Distribution Company Limited – ‘महावितरण’च्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत एक लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला. त्यातून त्यांची तब्बल दोन कोटी २१ लाख रुपयांची वार्षिक बचत होत आहे.

🌐 गो ग्रीन महावीतरण योजनेत मोबाईलवरून 5 मिनिटांत नोंदणी करण्यासाठी :- येथे क्लिक करा

Go Green Mahavitaran yojana | गो ग्रीन महावीतरण योजना

गो ग्रीन नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे लाईट बिल असणे आवश्यक आहे, गो ग्रीन नोंदणी केल्यानंतर प्रती महिन्याला मिळणारे लाईट बिल (हार्डकॉपी) तुम्हाला मिळणार नाही. म्हणजेच आपल्याला ई-मेल वरती वीज बिल मिळेल. आपण मोबाईल वरून ते बिल भरू शकता.

नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे बिल हे मोबाईल वरती मिळेल. नोंदणी झाल्यानंतर ई मेल वरती ई मेल व्हेरीफीकेशन साठी मेल येईल. गो ग्रीन साठी नोंदणी केल्यानंतर वीज बिल ग्राहकाला ई मेल व एसएमएस द्वारे बिल मिळेल. यामुळे वीज बिल ग्राहकाला प्रत्येक वीजबिलामध्ये १० रुपये सूट सवलत मिळणार आहे, म्हणजेच वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे.

🌐 गो ग्रीन महावीतरण योजनेत मोबाईलवरून 5 मिनिटांत नोंदणी करण्यासाठी :- येथे क्लिक करा

गो ग्रीन साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी छापील वीज बिलावरती असणारा १५ अंकी GGN क्रमांक असणे आवश्यक आहे, गो ग्रीन नोंदणी झाल्यानंतर आपण ऑनलाईन विज बिल/ लाईट बिल भरू शकता.

महावितरणच्या ‘गो- ग्रीन’ योजनेंतर्गत नोंदणी करण्याची प्रोसेस  – MSEDCL Go Green Ebill Application Registration:

‘गो- ग्रीन’ (MSEDCL Go Green Ebill Application Registration) योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम खालील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पोर्टलला भेट द्या.

https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreen.jsp

पोर्टल ओपन झाल्यानंतर Go Green Registration मेनू मध्ये ग्राहक जोडणी प्रकार, ग्राहक क्रमांक, आणि बिलिंग युनिट एन्टर करून Search Consumer पर्यायावर क्लिक करा.

(MSEDCL Go Green Ebill Application Registration)
Go Green Registration

पुढे छापिल वीजदेयकांमध्ये नमूद असलेला 15 अंकी GGN क्रमांक प्रविष्ट करा आणि Submit बटनवर क्लिक करा.

(MSEDCL Go Green Ebill Application Registration)
GGN Number-GGN

15 अंकी GGN क्रमांक सबमिट केल्यानंतर तुम्हाला ईमेल पाठवला जाईल. कृपया GoGreen अर्ज पूर्ण करण्यासाठी ईमेलमध्ये प्रदान केलेल्या पुष्टीकरण दुव्यावर क्लिक करा. पुढील बिलिंग सायकलपासून, तुम्हाला नोंदणीकृत मेल आयडीवर ई-बिल प्राप्त होईल.

सुचना:

  • छापिल वीजदेयकांमध्ये नमूद असलेला 15 अंकी GGN क्रमांक प्रविष्ट करा (स्क्वेअर बॉक्समध्ये)
  • आपण नोंदणी केल्यास आपल्या पत्त्यावर हार्ड कॉपी बिल प्राप्त होणार नाही. त्याऐवजी आपल्याला नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर ई-बिल मिळेल.
  • गो-ग्रीन नोंदणी पूर्ण करण्यासाठी कृपया मेलद्वारे पाठविलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नोंदणीनंतर ग्राहकांना पुढील बिलात रु. 10 / – प्रति बिल Go -Green सवलत मिळेल.
  • आपले बिल ई-मेल वर मिळवा. आपले ई-बिल स्पॅम फोल्डरमध्ये अडकू नये यासाठी कृपया आपल्या ॲड्रेस बुकमध्ये महावितरणचा ईमेल पत्ता msedcl_ebill@mahadiscom.in जोडा.

गो ग्रीन नोंदणी रद्द करण्यासाठी लिंक (Go Green Unsubscription):

तुम्हाला गो-ग्रीनचे (MSEDCL Go Green Ebill Application Registration) सदस्यत्व रद्द करायचे असल्यास खालील लिंकला भेट द्या.

https://pro.mahadiscom.in/Go-Green/gogreenUnsubscribe.jsp