MSSC Naukri 2024 : नमस्कार भावांनो, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSSC ( Maharashtra State Security Corporation) मुख्यालय मुंबई अंतर्गत “ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची अधिकृत जाहिरात तसेच रिक्त पदांची माहिती, जसे की शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. तरी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचा. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
Maharashtra State Security Corporation Naukri 2024
● पदाचे नाव : या भरती मध्ये ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन ही पदे भरली जात आहेत
● पद संख्या : एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरू आहे
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. GCC ची शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word / Excel चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
कार्यालयीन सहाय्यक / क्लर्क / टायपिस्ट या पदाचा खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनांमध्ये किमान ०३ वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे पेक्षा जास्त नसावे.
● परीक्षा फी : जनरल/ओबीसी – रु.100/-[SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
● वेतनमान : Rs. 35,000/- दरमहा पगार मिळेल.
● नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 सप्टेंबर 2024 ही आहे
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mahasecurity.gov.in |
क) मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दुरध्वनी क्र. :-
- पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.
- सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई – ४०० ००५.
- दूरध्वनी : (०२२) ६९९६५५५५ फॅक्स : (०२२) ६९९६५५९९.
ड) मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे :-
- १) वैयक्तिक माहिती (BIO-DATA)
- २) शैक्षणिक कागदपत्रे.
- ३) अनुभव प्रमाणपत्र.
- ४) Tally प्रमाणपत्र.
- ५) ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो / पॅन कार्ड / आधार कार्ड
How To Apply For MSSC Maharashtra State Security Corporation Application 2024
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
सदर पदांकरिता सविस्तर सूचना mahasecurity.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
इ) निवड प्रक्रिया :-
१. उमेदवारांच्या प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. किमान अर्हता प्राप्त उमेदवारांना मुलाखतीची वेळ दिनांक याबाबत भ्रमणध्वनी तसेच ई- मेलव्दारे कळविण्यात येईल.
२. उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM Software) पत्रलेखन, नस्ती लेखन तसेच Word, Excel इ. बाबत संगणकावर परिक्षा घेण्यात येईल. परिक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.
३. टायपिंग, मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांची नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येईल आणि महामंडळात उपलब्ध जागेनुसार या सुचीमधील गुणानुक्रम विचारात घेऊन नियुक्ती दिली जाईल.
४. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल.
५. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने कंत्राटी तत्वावर ०१ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नुतनीकरण करण्यात येईल.