Raigad District Central Co-Operative Bank Bharti 2024 :- नमस्कार लाडक्या भावांनो, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपिक” पदांच्या 200 जागांवर भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपिक” पदांच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे. या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
Raigad DCC Bank Jobs – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग या बँकेकरीता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून निवड सूची तयार करणेसाठी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकेचे संकेत स्थळावर www.rdccbank.com किंवा www.raigaddccbrecruitment.com उपलब्ध आहे.
● भरती प्रकार व विभाग : ही एक प्रकारची राज्य शासनाची सरकारी नोकरी आहे; रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अलिबाग या बँकेकरीता लिपिक हुद्द्याची रिक्त पदे सरळसेवा भरती सुरू आहे.
● पदाचे नाव : लिपिक / Clerk
● पद संख्या : एकूण 200 जागा
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेची पदवीधर असावा. उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसाचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (संगणक पदवी असल्यास अट शिथिल) |
● नोकरी ठिकाण : अलिबाग या बँकेत नोकरी मिळेल.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 21 ते कमाल 42 वर्षे असावे.
● वेतनमान : निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे वेतन मिळेल.
दाचे नाव | वेतनश्रेणी |
लिपिक | ११४००-११०० (८)-२०२००-१३०० (८)-३०६००-१५००(११)-४६०००-१५०० (६)-५५००० अंदाजे एकत्रित वेतन रु. २५००० |
● परीक्षा शुल्क : ऑनलाईन परिक्षा शुल्क रु. 500 + GST 90 असे एकूण 590 संकेत स्थळावर भरल्या शिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. सदर ऑनलाईन परिक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परिक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.
● अर्ज करण्याची पध्दत : ऑनलाईन – ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करावयाच्या सविस्तर सूचना बँकेच्या https://www.rdccbank.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. सदर ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर दि 5 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत खुला राहील.
ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम फक्त रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या संकेत स्थळावर UPI/QR मार्फत स्विकारली जाईल. अन्य कोणत्याही मार्गाने परिक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही. ऑनलाईन परिक्षा शुल्क दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत स्विकारले जाईल. ऑनलाईन परिक्षा शुल्क भरलेले उमेदवारच ऑनलाईन परिक्षेस पात्र राहतील.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024 आहे.
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | rdccbank.com |
निवड कार्यपध्दती ऑनलाईन परीक्षा :
लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यांत येईल. सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या याप्रमाणे ९० गुणांची राहिल. या ऑनलाईन परीक्षेसाठी ९० मिनिटांचा कालावधी राहील. ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयांच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल. गणित, बॅकिंग व सहकार, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्था, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुध्दीमापन चाचणी इत्यादी. तसेच ऑनलाईन परिक्षेचे माध्यम इंग्रजी व मराठी भाषेतून असेल. परंतु ज्या इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठी मध्ये संयुक्तिक शब्द नसेल त्या ठिकाणी इंग्रजी मध्ये शब्द आहे तसा ठेवला जाईल.
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत :
ऑनलाईन परिक्षेतील गुणांच्या गुणानुक्रमे उपरोक्त नमूद पद संख्येच्या १:३ प्रमाणानुसार मुलाखतीस पात्र उमेदवारांची आसन क्रमांक निहाय यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर मुलाखतीस पात्र उमेदवारांस मुलाखतीपुर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणीसाठी व मुलाखतीस मुलाखतपत्र ई-मेल द्वारे उपलब्ध करुन दिले जाईल. मुलाखतपत्र डाऊनलोड करण्यास अडचण निर्माण झाल्यास recruitment2024@rdccbank.in या ई-मेल द्वारे व 9225176100 या हेल्पलाईनद्वारे संपर्क साधावा. कागदपत्रे पडताळणी वेळी उमेदवाराने मुळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल.
ऑनलाईन परिक्षा शुल्क :-
ऑनलाईन परिक्षेकरीता रु. ५९० शुल्क आकारले जाईल, सदर ऑनलाईन परिक्षा शुल्क हे ना परतावा राहील. एकदा भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही सबबीवर परत केले जाणार नाही किंवा इतर कोणत्याही परिक्षा किंवा निवडीसाठी राखीव ठेवता येणार नाही.
इ) ऑनलाईन परिक्षे संदर्भात उमेदवारांना महत्वाच्या सूचनाः-
१) उमेदवाराने अर्जात भरलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा सत्य माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवारांची उमेदवारी/नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
२) उमेदवारांनी भरती प्रक्रियेकामी कोणत्याही पदाधिकारी/अधिकारी यांचेकडून शिफारस/दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्र घोषित करुन निवड प्रक्रियेतून बाद केले जाईल.
३) ऑनलाईन परिक्षेनंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीचे दिवशी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविले जाईल.
४) उमेदवारांना ऑनलाईन परिक्षा, कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल
५) यापुर्वी बँकेकडे याच पदासाठी अर्ज केले असतील तर त्यांचे पुर्वीचे अर्ज ग्राहय धरले जाणार नाही. त्यांना नव्याने ऑनलाईन पद्धतीने विहीत नमून्यात अर्ज सादर करणे आवश्यक राहील.
६) भरती प्रक्रियेत/निवड कार्यपद्धतीत बदल करण्याचा अधिकार बँकेस असेल व ऐनवेळी काही बदल झाल्यास तो वर्तमानपत्रात किंवा बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला जाईल. याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक स्वरुपात कळविले जाणार नाही.
७) उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात किमान १५ वर्षे अधिवास असणे आवश्यक आहे.
८) उमेदवाराची ऑनलाईन परिक्षा प्रामुख्याने नवी मुंबई शहरातील/रायगड जिल्यातील केंद्रावर घेण्यात येईल. मात्र आवश्यकते नुसार इतर केंद्रावरही परिक्षा घेतली जाईल.
९) उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
१०) बँकेने सदर भरती प्रक्रिया तसेच परिक्षेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी कोणत्याही पब्लिकेशन एजन्सीची नियुक्ती केलेली नाही. यासंदर्भात कोणतीही जाहिरात अगर माहिती ही बेकायदेशीर आहे असे समजण्यात यावे.
११) काही अपरिहार्य/आपत्कालीन कारणास्तव परिक्षा स्थगित करणे/पुढे ढकलणे, अंशतः बदल करणे याबाबतचे सर्व अधिकार बँकेस असतील.
१२) भरती प्रक्रियेसंदर्भात उद्भवणारे वाद/तक्रारीबाबत बँकेचा निर्णय अंतिम राहील.
१३) सदर भरती प्रक्रिये अंतर्गत कोविड-१९ या संसर्गजन्य रोगाच्या संदर्भातील शासनाकडील वेळोवेळीच्या मार्गदर्शक सुचनाचे पालन करण्यात यावे.
📑Advertisement | READ PDF |
![]() | Apply Online |
How To Apply For Clerk post at Raigad DCC Bank Jobs 2024
वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन परिक्षेचे शुल्क भरण्याची पद्धत –
लिपिक पदाकरीता बँकेच्या https://www.rdccbank.com किंवा www.raigaddccbrecruitment.com या अधिकृत संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही. उमेदवारानी ऑनलाईन अर्जात नोंदविलेला ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक चुकीचा/अपुर्ण असल्यास तसेच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND) असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिये दरम्यान त्याद्वारे पाठविल्या जाणाऱ्या सूचना, संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. त्याचप्रमाणे ई-मेल आयडी व संदेश वहनात येणाऱ्या तांत्रिक अडचणीना बँक जबाबदार राहणार नाही. सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.