Rajarshee Chhatrapati Shahu Maharaj Govt. Medical College Kolhapur. GMC Kolhapur Recruitment 2024 ;- नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक ३१/१०/२०२४ पासून दिनांक २०/११/२०२४, २३:५९ वाजेपर्यंत या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत..,
सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येणार असून (RCSMGMC Bharti) अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती खालील संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. उमेदवारांची शैक्षणिक अर्हता/पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
GMC Kolhapur Bharti 2024
● पद संख्या : विविध पदांच्या एकूण 102 रिक्त जागांसाठी ही भरती सुरू आहे
● पदाचे नाव आणि सविस्तर तपशील : खालीलप्रमाणे
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) | 08 |
2 | शिपाई (महाविद्यालय) | 03 |
3 | मदतनीस (महाविद्यालय) | 01 |
4 | क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
5 | शिपाई (रुग्णालय) | 08 |
6 | प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) | 03 |
7 | रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
8 | अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
9 | बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
10 | कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
Total | 102 |
📚 शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)
अर्जाची फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करा
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024
परीक्षा दिनांक : नंतर कळविण्यात येईल.
How To Apply For GMC Kolhapur Senior Resident Application 2024
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्जा सोबत फॉर्म भरताना आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.