Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :- नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधिक्षक (महिला), गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरिक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील खालील तक्त्यात नमुद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
🤔 उमेदवारांसाठी सूचना : भरती बद्दलची खाली देण्यात आलेली माहिती एकदा स्वतः उमेदवाराने वाचावी. त्यानंतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फॉर्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा वाचा.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.⤵️
समाज कल्याण विभाग भरती | Social Welfare Recruitment 2024
● पद संख्या : एकूण 219 जागांसाठी ही भरती सुरू आहे त्यामुळे सरकारी नोकरी मिळवण्याची तुमच्याकडे चांगलीच संधी आहे.
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : खाली सविस्तर वाचा..,
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | उच्चश्रेणी लघुलेखक | 10 |
2 | गृहपाल/अधीक्षक (महिला) | 92 |
3 | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | 61 |
4 | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | 05 |
5 | निम्नश्रेणी लघुलेखक | 03 |
6 | समाज कल्याण निरीक्षक | 39 |
7 | लघुटंकलेखक | 09 |
एकूण जागा | 219 |
● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
- पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2024 रोजी किमान 18 ते कमाल 43 वर्षे (नियमानुसार सूट)
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- ; राखीव श्रेणी: रु. 900/-
● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2024 31 डिसेंबर 2024 (मुदतवाढ)
● परीक्षा तारीख : नंतर कळविण्यात येईल.
● Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024 महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख
11 नोव्हेंबर 202431 डिसेंबर 2024 आहे. - अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.