सुकन्या समृद्धी योजना 2024 : सर्वांना नमस्कार, ऑक्टोबर महिन्यात पोस्ट विभागातर्फे शक्ती उत्सव हे अभियान आयोजित केलं आहे. त्या अंतर्गत या महिन्यात पोस्ट विभाग १० वर्षाच्या आतील मुलींसाठी असणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेचे खाते ओपन करून आपल्या लेकीचे भविष्य सुरक्षित करणार आहोत.
Sukanya Samriddhi Account Scheme : भविष्याच्या दृष्टीनं अनेकजण आता गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत. बँकेप्रमाणेच पोस्टातही गुंतवणूकीच्या अनेक स्कीम्स उपलब्ध आहेत. पाहूया तुम्ही याद्वारे कशी कमाई करू शकता.
मुलगी शिकली तर तिच्या पंखांना आभाळात झेपावण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.
शिक्षणासाठी आर्थिक तरतूद लागते. त्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हे उत्तम आणि विश्वसनीय माध्यम आहे.
अगदी कमीत कमी वयात मुलीचं आधारकार्ड काढल्याबरोबर तिचं सुकन्या समृद्धी योजनेचं खातं ओपन करणे फायदेशीर आहे.
सुकन्या समृद्धी योजना कसं ते बघुयात
सदर सुकन्या समृद्धी योजना खात्याला सर्वात जास्त व्याजदर आहे.
सध्या तो ८.२% आहे आणि तुम्ही खात्यात टाकलेल्या रकमेला चक्रवाढ व्याज मिळतं. जे ३१ मार्चला खात्यात वर्ग होतं.
सुरुवातीला कमीत कमी २५० रु खात्यावर टाकून हे खाते ओपन होते. त्याचे पासबुक मिळते. नंतर एका वर्षात तुम्ही या खात्यावर कमीत कमी २५० रु पासून जास्तीत जास्त १.५ लाख रु टाकू शकता.
दरवर्षी तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार दिलेल्या मर्यादेत रक्कम टाकू शकता. प्रत्येक वर्षी सारखीच रक्कम टाकली पाहिजे अशी कोणतीही अट नाही.
ही रक्कम तुम्हाला खाते ओपन केल्यापासून १५ वर्षे टाकायची आहे.
खाते ओपन केल्यापासून २१ वर्षांनी तुम्हाला व्याजासहित चांगली रक्कम मिळते. सदर व्याजावर कुठलाही टॅक्स आकाराला जाणार नाही.
किंवा मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर शिक्षणासाठी एकूण जमलेल्या रकमेतून ५०% रक्कम काढता येईल..
किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळी सदर खाते बंद करता येते..
तसेच या खात्यात गुंतवलेली रक्कम इन्कम टॅक्स कायदा १९६१ अंतर्गत असलेल्या कलम ८० क (C) मध्ये वजावटीत सुद्धा दाखवता येते.
तुम्हाला माहितीये आपलं पोस्ट आता डिजिटल आणि वेगवान झालंय. तुम्ही जर इंडिया पोस्ट पेमेंट बँक ( IPPB ) चं खातं ओपन केलं तर IPPB Mobile Banking या अप्लिकेशनवरून घरबसल्या तुमच्या लेकीच्या खात्यात पाहिजे तेंव्हा वरील मर्यादेत पैसे टाकू शकता..
सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यास आवश्यक गोष्टी: 📑
१) मुलीचा जन्मदाखला आणि आधारकार्ड झेरॉक्स
२) वडिलांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि २ फोटो.
( जर मुलीसोबत वडिलांऐवजी आईचं खातं जोडलं तर आईचे वरील कागदपत्रे लागतील.)
३) २५० रु. किंवा जास्तही रक्कम टाकू शकता.
टिप :- या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील किंवा जवळच्या पोस्टातील ब्रांच पोस्ट मास्तर यांना भेटावे लागेल व त्यानंतर ते तुम्हाला या योजनेत सहभागी करून घेतील.