APAAR ID Card – Automated Permanent Academic Account Registry :- नमस्कार मित्रांनो, देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार (APAAR ID) कार्ड (Automated Permanent Academic Account Registry) बनवले जाईल. यामध्ये त्यांच्या शैक्षणिक तपशील आणि इतर नोंदी केल्या जातील.
हे ‘वन नेशन, वन स्टुडंट आयडी’ म्हणून वापरले जाऊ शकते. APAAR ID कार्डमुळे देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा स्वतंत्र ओळख क्रमांक आणि सोबतच डिजिलॉकरची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. ‘एक देश, एक विद्यार्थी ओळख’ या संकल्पनेच्या अंतर्गत हा उपक्रम आहे.
‘अपार आयडी’ (APAAR ID) म्हणजे काय ?
‘ऑटोमेटेड पर्मनंट अॅकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री’ याचे लघुरूप म्हणजे ‘अपार (APAAR ID)’. अपार हा देशातील पूर्व प्राथमिक ते उच्चशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी कायमस्वरूपी ओळखक्रमांक आहे. ‘युनिफाइड डिस्ट्रिक्ट अँड इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एज्युकेशन प्लस’ म्हणजेच ‘यू-डायस पोर्टलमध्ये सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. येथे त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक (पीईएन) नोंदवलेला आहे. ‘अपार आयडी’ (APAAR ID) या ‘पीईएन’ची जागा घेणार आहे.
APAAR ID कार्डचा फायदा काय?
1. विद्यार्थ्यांना एका शाळेतून दुसर्या शाळेत दाखला घेण्यासाठी, देशातील कोणत्याही महाविद्यालयात, पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी APAAR ID कार्डचा डेटा वापरता येईल. APAAR ID अपार 12 अंकांच्या आधारे त्याचा प्रवेश निश्चित होईल.
2. अपार (APAAR ID) कार्डच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध परीक्षा शुल्क भरणा, उत्तीर्ण परीक्षा आणि त्याचा रेकॉर्ड ट्रॅक होईल. तसेच त्यांच्या 12 अंकी क्रमांका आधारे शैक्षणिक सत्रातील निकाल ऑनलाईन पाहता येईल.
3. अपार (APAAR ID) कार्ड विद्यार्थ्यांना सार्वजनिक बस सेवेत सवलत मिळेल. सध्या राज्यात एसटी महामंडळ विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास योजना राबवते. त्यासाठी हे कार्ड ग्राह्य असेल.
4. APAAR ID कार्डमुळे विद्यार्थ्यांना विविध सरकारी संग्रहालयात मोफत प्रवेश असेल.
5. सरकारकडे एकदा डाटा आल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांना मोफत पुस्तकं आणि वह्यांचा पुरवठा होईल. त्यांना स्टेशनरी पुरवण्यात येईल.
6. विद्यार्थी, पालक यांचे आधार कार्ड आणि त्याला पॅन कार्ड जोडणी झाल्यानंतर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा देणे सोपे होईल
7. यापुढे विद्यार्थ्यांचे बँकेतील खाते उघडताना आधार कार्ड आणि अपार (APAAR ID) आयडी महत्त्वाचा असेल. त्यामुळे गरजू आणि पात्र विद्यार्थ्यालाच शिष्यवृत्तीची रक्कम मिळाली हे निश्चित होईल.
8. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड आणि अपार (APAAR ID) कार्ड संलग्न असेल. विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ या खात्यात जमा होईल. त्यांच्या पुरस्काराची रक्कम, विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची रक्कम या खात्यात जमा होणार आहे.
9. सरकारी विद्यार्थी वसतिगृहात आणि विविध खासगी वसतिगृहात प्रवेशासाठी आधार आणि अपार (APAAR ID) कार्ड महत्त्वाचे असेल. त्याआधारे सवलत मिळेल.
10. देशभरात शैक्षणिक सहली आयोजन करताना विद्यार्थ्यांच्या या माहितीचा उपयोग होईल. विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी सवलतीत प्रवास आणि राहण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचा वापर होईल.
13. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळतीचे प्रमाण, त्यामागील कारण, शिक्षकांची संख्या आणि जिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवून बोगस गिरी सुरू आहे, ते सर्व प्रकार या नवीन अपार (APAAR ID) कार्डमुळे समोर येतील. पट संख्या नसताना शिक्षकांची नियुक्ती, अतिरिक्त शिक्षक, शिक्षकांची गरज या सर्वांची गोळाबेरीज समोर येईल.
📢 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करून सर्व फायद्यांचा लाभ घेण्यासाठी :- इथे क्लिक करा.
अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ – APAAR ID Card :
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार (APAAR ID) आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. दि. २५ नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राज्यातील ६५ (३१%) लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून APAAR आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाकडून दि. ३० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना अपार (APAAR ID) आयडी उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.
केंद्र शासनाचे निर्देश विचारात घेवून राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी राज्यातील सर्व व्यवस्थापन / सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये ‘APAAR दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.
सदर दिवशी APAAR आयडी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा स्तरावरून APAAR आयडीवावत शाळेच्या मुख्याध्यापक यांची ऑनलाईन आढावा बैठक आयोजित करून सर्व शाळांचा आढावा घेवून संबंधितांना सूचना देण्यात येणार आहेत.
📢 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी व ऑनलाइन अर्ज करून सर्व फायद्यांचा लाभ घेण्यासाठी :- इथे क्लिक करा.