BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1846 जागांसाठी नोकर भरती सुरू; पदवीधरांनो लगेचच अर्ज करा..,

BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘कार्यकारी सहायक’ (पूर्वीचे पद: लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी दिनांक 20 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या भरतीसाठी ‘माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( दहावी ) आणि पदवी परीक्षेत ‘प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण’ ही शैक्षणिक अट लागू करण्यात आली होती. तथापि, त्यातील ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याची सूचना आणि मागणी विविध स्तरांवरुन करण्यात आली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘प्रथम प्रयत्नात’ ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. व आत्ता नव्याने भरती सुरू झालेली आहे

बृहन्मुंबई महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी (BMC Bharti) 1846 जागांसाठी २०२४ मध्ये भरती सुरू आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरतीची (BMC Bharti) अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 सप्टेंबर 2024 असणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

एकूण : 1846 जागा

पदाचे नाव आणि तपशील : खाली सविस्तर माहिती वाचा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कार्यकारी सहायक (लिपिक)1846
एकूण1846

शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी  (ii) इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट: 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई – महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2024  11 ऑक्टोबर 2024

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (BMC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for BMC Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.

आधी अर्ज केलेल्यांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही

या शैक्षणिक अर्हतेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली आहे. सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करुन, ‘कार्यकारी सहायक’ पद भरतीची सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला असून त्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

ही भरती वाचा :- TMC Recruitment 2024 : ठाणे महापालिकेत नवीन भरती सुरू; पात्रता 10वी पास, महिन्याला 20,000 पगार – येथे अर्ज करा