How to Apply for PM Awas Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, २५ जून २०१५ पासून ‘सर्वांसाठी घरे’ या पंतप्रधान आवास योजनेला सुरुवात करण्यात आली होती. ही योजना आधी २०२२ पर्यंत होती, नंतर तिची मुदत वाढवण्यात आली. नागरी व ग्रामीण अशा दोन भागात ही योजना विभागण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतात. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र गरीब कुटुंबांसाठी एकूण ३.२१ कोटी घरं बांधण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत आणखी तीन कोटी घरं बांधण्याचा निर्णय जून महिन्यात पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या आवास प्लसच्या प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंदणीकृत परंतु स्वयंचलित प्रणालीद्वारे रद्द केलेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. वरीलपैकी, इतर मागासवर्गीय पात्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी किंवा सध्याचे कच्चा घर पक्क्या घरामध्ये रूपांतरित करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
लाभार्थ्यांना किमान 269 चौरस मीटर आवश्यक आहे. फूट क्षेत्र बांधकामासाठी आवश्यक असेल. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून निवडलेल्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणार असून तालुकास्तरावर गटविकास अधिका-यांमार्फत लाभार्थ्यांची चाचपणी करून घरकुल प्रस्तावाच्या निकषानुसार लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
वित्त भार – या योजनेअंतर्गत पुढील ३ वर्षामध्ये इतर मागास प्रवर्गातील १० लाख पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ खालीलप्रमाणे देण्याचे प्रस्तावित आहे.
वर्ष | उद्दिष्ट | आर्थिक भार |
२०२३-२४ | ३ लाख | रु.३६०० कोटी |
२०२४-२५ | ३ लाख | रु.३६०० कोटी |
२०२५-२६ | ४ लाख | रु. ४८०० कोटी |
एकुण | १० लाख | रु.१२००० कोटी |
पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्रता
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- या योजनेसाठी अर्ज करणारे नागरिक सरकारी नोकरी करणारे नसावे.
- करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.
- १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अर्जदार या योजनेसाठी पात्र असतात.
- अर्ज करणाऱ्यांच्या नावाने घर नसावे.
- अर्जदाराने या योजनेचा आधी लाभ घेतलेला नसावा.
- ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीवर असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- ईडब्ल्यूएस कोट्यातील लोकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
पंतप्रधान आवास योजनेचे प्रकार
- पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G)
- पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U)
पंतप्रधान आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बीपीएल कार्ड
- बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट साइझ फोटो
- रहिवासी दाखला
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करता येतात. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जावे लागेल.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी –
पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- https://pmaymis.gov.in/ वेबसाइटवर गेल्यावर होम पेज उघडेल.
- तिथे असलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- आता या अर्जामध्ये मागितलेली माहिती अचूक भरा.
- त्यानंतर तिथे सांगितलेली आवश्यक कागदपत्रं स्कॅन करून अपलोड करा.
- यानंतर तुम्हाला फायनल सबमिट हा पर्याय दिसेल.
- तुम्ही अर्ज नीट भरल्यावर फायनल सबमिट या पर्यायावर क्लिक करा.
या स्टेप्स फॉलो करून तुम्ही पीएम आवास योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
PMAY अर्जाची स्थिती मूल्यांकन आयडीसह तपासण्याची प्रक्रिया
पायरी: 1 – प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाइटवर लॉग इन करा: http://pmaymis.gov.in/Track_Application_Status.aspx किंवा ‘ सिटिझन ॲप्लिकेशन ‘ पर्यायावर जा आणि नंतर ‘स्टेटस तपासा ‘ बटण निवडा.
पायरी: 2 – जेव्हा तुम्ही ट्रॅक बटण दाबाल, तेव्हा दोन पर्याय प्रदर्शित होतील: ‘ नावानुसार, वडिलांचे नाव आणि मोबाइल नंबर ‘ आणि ‘ असेसमेंट आयडी ‘.
पायरी: 3 – ‘ बाय असेसमेंट आयडी ‘ निवडा.
पायरी: 4 – फॉर्म भरल्यावर आणि सबमिट केल्यावर नियुक्त केलेला असेसमेंट आयडी आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करा.
पायरी: 5 – तपशील भरल्यानंतर, ‘ सबमिट ‘ नावाच्या पर्यायावर क्लिक करा.
पायरी: 6 – वापरकर्त्याला त्याचा अर्ज कोणत्या टप्प्यावर आहे हे लवकरच कळेल
टीप – योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय (GR) वाचवा किंवाच तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय : राज्यात इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी “मोदी आवास” घरकुल योजना राबविण्याबाबत शासन निर्णय पाहण्यासाठी :- इथे क्लिक करा.