Ladki Bahin Yojana News : लाडक्या बहिणींनो! डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? सरकारने दिली सर्वात मोठी अपडेट – इथे वाचा

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : सर्वांना नमस्कार, महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या हेतुने लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. आतापर्यंत सव्वा दोन कोटिंहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. परंतु, राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहित लागू झाल्याने महिला व बालविकास विभागाने या योजनेचे हफ्ते तात्काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून आचारसंहिता सुरु झाली आहे. त्यामुळे जवळपास दहा लाख महिला नोव्हेंबरच्या हफ्त्यापासून वंचित राहिल्याचं समजते. तर महायुती सरकारने इतर महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हफ्त्याची रक्कम आधीच जमा केली आहे. परंतु, या योजनेच्या अनेक पात्र महिलांना आता डिसेंबरच्या हफ्त्याची प्रतिक्षा लागली आहे. डिसेंबरचे 1500 रुपये किती तारखेला मिळणार? असा प्रश्न महिलावर्गाने उपस्थित केला आहे. 

📢 हे वाचले का तुम्ही :- लाडकी बहीण योजना : महिलांनो…, लाडकी बहीण योजनेचे नियम मोडून पैस घेतले? डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी अन् होणार वसुली?

दरम्यान, जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये महायुतीचा मेळावा नुकताच पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं होतं. लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही. सावत्र भावांनी ही योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना जोडे दाखवा, अशी टीका शिंदे यांनी विरोधकांवर केली होती.

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता आचारसंहिता संपल्यानंतर मिळेल, असं आश्वासनी शिंदे यांनी दिलं होतं. येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. म्हणजे महिलांना डिसेंबर महिन्यातच या योजनेचे पैसे मिळतील, अशी शक्यता सरकारकडून वर्तवण्यात येत आहे.

🔔 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा

📣 हे पण वाचा :- Small business ideas : अत्यंत कमी खर्चात सुरू करता येणारे 10 व्यवसाय; तरूणांनो पैसे पाहिजे ना मग इथे वाचा सविस्तर..,