Apply for Common Service Centres 2024 : नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत कॉमन सर्विस सेंटर हा महत्वाचा प्रकल्प आहे जो या माध्यमातून भारतातील प्रत्येक गावातून आधुनिक अश्या ऑनलाईन सेवा या CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर (Common Service Centres) च्या माध्यमातून देण्यात येतात. यामुळे अनेक नागरिकांना त्याचा फायदा होत असून CSC धारकांना रोजगाराची मोठी संधी प्राप्त झालेली आहे.
आपल्या महाराष्ट्रात राज्यमध्ये CSC (Common Service Centre) ला आपले सरकार सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते यात सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा या केंद्रातून नागरिकांना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांचा सर्वांगीण विकास होत आहे.
सीएससी हे प्रवेशाचे ठिकाण आहेत जे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रहिवाशांना ई-गव्हर्नन्स प्रणालीद्वारे सरकारी कार्यक्रम आणि सेवांशी जोडण्याची परवानगी देतात. ही क्षेत्रे नागरिकांना इंटरनेट कनेक्शनद्वारे विविध सरकारी सेवा आणि कार्यक्रमांशी जोडण्याची सुविधा देतात.
लेखाचे नाव | कॉमन सर्व्हिस सेंटर (common service center CSC) जनसेवा केंद्र |
यांनी सुरू केले | भारत सरकार |
लाभार्थी | भारताचे नागरिक |
उद्धिष्ट | विविध प्रकारच्या ऑनलाइन सेवा प्रदान करण्यासाठी |
अधिकृत संकेतस्थळ | https://register.csc.gov.in/ |
CSC सेंटरची वैशिष्ट्ये :
- भारतातील लाखो युवा बेरोजगारांना उत्पन्न मिळवण्याची संधी दिली गेली आहे.
- सीएससी द्वारे विविध प्रकल्प राबवून देशाला पूर्ण पणे ऑनलाईन जोडण्याचे काम करत आहेत.
- गावातील लोकांना विविध सरकारी योजना आणि विविध सरकारी दाखले संदर्भातील कामे एकाच ठिकाणी केली जातात.
- अनेक लोक सीएससी (CSC – Common Service Centres) सेंटर घेण्यासाठी इच्छुक होते परंतु त्यासाठी नोंदणी चालू नसल्याने नाराज होते परंतु आता पुन्हा देशात
- सीएससी रजिस्ट्रेशन (CSC Digital Seva Registration) चालू झाले आहे परंतु या वेळी तुम्हाला काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
आता भारत सरकारच्या नवीन नियमणूसार आपणास CSC (सीएससी) साठी अर्ज करताना TEC (Telecentre Entrepreneur Course) सर्टिफिकेट आवश्यक आहे त्या शिवाय तुम्ही अर्ज करू शकणार नाही. आपण स्वता यासाठी अर्ज करून घरबसल्या ऑनलाईन परीक्षा देवून सर्टिफिकेट प्राप्त करू शकता.
TEC कोर्स साठी अँप्लिकेशन कसे करावे?
या कोर्स साठी अर्ज करण्यासाठी आपण त्याच्या अधिकृत वेबसाइट http://www.cscentrepreneur.in/ या ठिकाणी जावून माहिती घेवू शकता.
जरी यापूर्वी आपण CSC सेंटर घेतले असेल तरी सुद्धा हा कोर्स आपणास करणे आवश्यक आहे.
इथे टीईसी कोर्स साठी अर्ज करण्यासाठी दोन पर्याय दिसतील 1) CSC VLE 2) सामान्य नागरिक जर तुम्हाला या आधीच CSC ID मिळाला असेल तर login with Digital Seva Portal लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता.
आपण जर आपणाकडे सीएससी आयडी नसेल तर Public Users लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकता. या मध्ये लॉगिन /रजिस्टर मध्ये जाऊन आपली माहिती भरावी व रजिस्टर करावे.
TEC कोर्स साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक माहिती, फोटो (Size 50 KB पेक्षा कमी साइज) हे डॉक्युमेंट लागतात.
TEC Registration साठी आपले नाव, मोबाईल नंबर , ईमेल, वडीलाचे नाव/पतीचे नाव, संपूर्ण पत्ता, जन्म तारीख आणि आपला फोटो उपलोड (Size 50 KB) पेक्षा कमी असावी) करावा व सबमीट करावे.
या नंतर पुढे फी पेमेंट पेज ओपन होईल इथे कोर्स फी 1479 रुपये पेमेंट करावे लागते. हे पेमेंट आपण क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड,नेट बँकिंग याच्या माध्यमातून ऑनलाइन करावे.
पेमेंट झाल्यानंतर आपल्याला नवीन पेज वर आपणास एक युजर आयडी मिळेल, व पासवर्ड हा आपला रजिस्टर करताना टाकलेला मोबाईल नंबर असेल.
आपले पेमेंट यशस्वी झाल्यावर आपल्याला पुढील महिती साठी http://www.cscentrepreneur.in/userlogin येथे जाऊन आपणास मिळालेला युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
TEC परीक्षा माहिती :
TEC Exam आपण आपल्या घरी बसून ऑनलाइन ही परीक्षा देऊ शकतो. आता तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये हिन्दी व इंग्रजी मध्ये काही PDF व व्हिडिओ मिळतील त्याचा तुम्हाला अभ्यास करून प्रत्येक मोड्यूल अभ्यास केल्यानंतर त्याच्या समोर असलेल्या असायमेंट यशस्वी रित्या पूर्ण करून त्या मध्ये दिलेल्या 10 मोड्यूल असायमेंट पास करायच्या आहेत. TEC कोर्स अभ्यासक्रम 40 तासाचा आहे.
असायमेंट पास झाल्यावर तुम्हाला तुमच्या लॉगिन मध्ये TEC सर्टिफिकेट नंबर मिळेल व आपण त्या लॉगिन मधून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. Tec Exam पास झाल्यावर सर्टिफिकेट मिळण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर तुम्ही CSC सेंटर साठी अर्ज करू शकता.
ही भरती वाचली का :- SSC GD Constable Naukri 2024 : खुशखबर! स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तब्बल 39,481 जागांसाठी मेगाभरती; पात्रता 10वी पास, असा करा अर्ज..,
CSC सेंटर साठी पात्रता:
- TEC सर्टिफिकेट (नवीन नियमांनुसार आवश्यक)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- कम्प्युटर हाताळण्याचे चे सामान्य ज्ञान
- कमीत कमी 10 वी पास असावा
- वयाची 18 वर्षे पूर्ण असावीत
- पदवी पास असावे – नवीन अट
CSC सेंटर साठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदारचा फोटो
- Proof Of Identity Card
- Proof of Address
- कॅन्सल बँक चेक
- पॅन कार्ड कॉपी
CSC सेंटर साठी आवश्यक साहित्य:
- डेस्कटॉप /लॅपटॉप कम्प्युटर
- कलर प्रिंटर
- वेब कॅमेरा
- स्कॅनर
- इंटरनेट कनेक्शन
अर्ज करण्यापूर्वी खालील महत्वाच्या सूचना अवश्य वाचा:
- अर्जदारचा फोटो हा 10 ते 25 KB पर्यंत साईजचा असावा.
- आधार कार्ड 80 KB पर्यंत साईजचा असावा.
- कॅन्सल चेकची साईज पण 80 KB पर्यंत असावी.
- सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवावीत.
- आधार नंबरला मोबाइल नंबर व ईमेल आयडी लिंक असणे आवश्यक आहे.
- बँक अकाऊंट असणे आवश्यक आहे.
CSC डिजिटल सेवा पोर्टलद्वारे प्रदान केलेल्या विशिष्ट सेवा
CSC केंद्रांद्वारे विशेष सेवा देखील दिल्या जातात जसे की:
शैक्षणिक सेवा
कृषी सेवा
आर्थिक सेवा
ग्राहक सेवा
UIDAI सेवा
बँकिंग सेवा
आरोग्य सेवा
इतर विशिष्ट आणि राज्यवार सेवा
सीएससी शिक्षण
इंग्रजी शिका
Nielit सुविधा केंद्र
टॅली प्रमाणित कार्यक्रम
टॅली कौशल्य प्रमाणपत्र
सीएससी ऑलिम्पियाड
जीएसटीचा परिचय
सीएससी अकादमी
NDLM
सायबरग्राम योजना
नाबार्ड आर्थिक साक्षरता कार्यक्रम
कायदेशीर साक्षरता कार्यक्रम
CSC टॉपर सेवा
कौशल्य केंद्र
CSC BCC कोर्स
कॉमन सर्व्हिस सेंटर सीएससी आर्थिक सेवा
CSC ग्रामीण ई स्टोअर
डिजिटल वित्त समावेश, जागरूकता आणि प्रवेश
कौशल्य विकास
GST सुविधा प्रदाता म्हणून CSC
बँकिंग – Rd, Fd, मनी ट्रान्सफर, Ekyc
विमा सेवा
पेन्शन सेवा
पंतप्रधान पीक विमा योजना (PMFBY)
CSC VlE मार्केट – ग्रामीण ई-कॉमर्स उपक्रम
CSC डिजिटल सेवा ग्राहक सेवा
मोबाईल रिचार्ज
D2H रिचार्ज
मोबाइल बिल भरणे
CSC नोंदणी स्थिती
सीएससी सेवा राज्यानुसार
महात्मा गांधी सेवा केंद्र प्रकल्प
SHG ID सह सर्व-राज्य SHG सूची
लोहिया स्वच्छ बोहर मोहीम
बिहार टॉयलेट ऑफलाइन फॉर्म
बिहार सार्वजनिक तक्रार निवारण अधिकारी कायदा
CSC डिजिटल सेवा UIDAI सेवा
फक्त राज्य आणि जिल्हा कार्यालय
बेस प्रिंट
मोबाईल नंबर प्रिंट
निवासाचा पत्ता बदलणे
ईमेल अपडेट
आधार अपडेट आणि सुधारणा
CSC कृषी सेवा
कॉमन सर्व्हिस सेंटर पीएम किसान बँक खाते अपडेट फॉर्म डाउनलोड करा
CSC Pm किसान सुधारणा आधार कार्ड तपशील संपादित करा
पीएम किसान नवीन शेतकरी नोंदणी
प्रधानमंत्री शेतकरी लाभार्थी दर्जा
पंतप्रधान शेतकरी यादी
CSC केंद्र ऑनलाइन 2020 अर्ज करा
CSC डिजिटल सेवा बँकिंग सेवा
ICICI बँक BC
ॲक्सिस बँक बीसी
CSC Digipay आधार Atm नवीनतम आवृत्ती
NPS
CSC लाभ खाते योजना NPS सेवा
नवीन खाते उघडणे
CSC बँक bc नोंदणी प्रक्रिया
आधार UCL नोंदणी 2020
कार कर्ज
क्रेडिट कार्ड
HDFC कर्ज BC
SBI बँक BC
CSC डिजिटल सेवा सेवा
जिल्हा व्यवस्थापक मोबाईल क्रमांक
CSC लोकेटर
VlE CSC प्रोफाइल अपडेट
CSC प्रमाणपत्र डाउनलोड
डिजिटल सेवा पोर्टल CSC
CSC विमा सेवा
लोन सर्व्हिस सीएससी
CSC आर्थिक जनगणना सेवा
कॉमन सर्व्हिस सेंटर बँकिंग पोर्टल / बँक बीसी
CSC डिजिटल सेवा आरोग्य सेवा
आरोग्य होमिओ
टेलीमेडिसिन – टेलिहेल्थ सल्ला
टेली-मेडिसिन रिमोट डायग्नोस्टिक किट- कंट्रोल एच
थायरोकेअर
सीएससी डायग्नोस्टिक सेंटर
प्रधानमंत्री जन औषधी भांडार योजना
जीव आयुर्वेदिक योजना
CSC नोंदणी स्थिती
3 नेहत्रा किट्स
CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज – Apply for Common Service Centres:
CSC सेंटर साठी ऑनलाईन नोंदणी अर्ज करताना सर्व प्रथम CSC (Common Service Centres) ची अधिकृत वेबसाइट https://register.csc.gov.in/ ओपन करा.
तिथे आपणास मुख्य मेनू मध्ये Apply हा टॅब दिसेल त्यावर क्लिक करून आपण New Registration हा पर्याय निवडावा.
आता CSC नोंदणी पेज ओपन होईल त्यामध्ये आपणास तिथे खालील तीन प्रकारची Registration पर्याय दिसतील.
- CSC VLE
- SHG (Self Help Group)
- RDD
हे सर्व पर्याय विविध लोकांसाठी आहेत .आपण वैयक्तिक अर्ज करणार असल्याने यातील पहिला CSC VLE हा प्रकार आपण निवडावा. इतर पर्याय हे बचत गट व शासकीय कार्यालये यांचे CSC Registration करण्यासाठी आहेत.
आपण CSC VLE हा पर्याय निवडल्यावर आपणाला TEC Certificate नंबर, मोबाईल नंबर व कॅप्चा कोड टाकून आपण सबमिट करावे.
पुढे आपणास आधार द्वारे प्रमाणीकरण करावे लागते यात आपण आधार बायोमाट्रिक ,आधार वर असलेल्या मोबाईल नंबर वर पाठवलेल्या OTP नंबर च्या मदतीने आपण आधार प्रमाणीकरण करा.
CSC नोंदणी अर्जात पुढे आपणास आपली जी आवश्यक माहिती विचारली जाते ती भरा व आपणास फोटो,आधार कार्ड, कॅन्सल चेक अपलोड करावी लागतात या मध्ये आपणास आपल्या सेंटर चे लोकेशन Longitude And Latitude च्या मदतीने दाखवावे लागते.
सर्व माहिती भरल्यावर आपन अर्ज सबमीट केल्यावर आपणास एक Application Reference Number मिळेल या नंबर च्या मदतीने आपल्या अर्जाची स्थिति आपण तपासू शकता व आपला अर्ज मान्य केला, की कोणत्या कारणाने अमान्य केला याची स्थिति आपण जाणून घेवू शकता.
CSC नोंदणी अर्जाची स्थिती तपासा:
आपण सीएससी सेंटर साठी नोंदणी अर्ज केल्यावर आपल्याला एक Application Reference Number मिळेल तो जपून ठेवावा. आपल्या अर्जाची स्थिति तपासण्यासाठी https://register.csc.gov.in/register/status या लिंक वर जावून आपला Application Reference Number व Captcha टाकून आपल्या अर्जाची स्थिति जाणून घेवू शकता.
CSC ID आणि Password:
आपला CSC – Common Service Centres नोंदणी अर्ज मंजूर झाल्यावर आपल्याला आधार Register ईमेल ID वर आपणास माहिती दिली जाईल त्यात आपणास DigiMail Credentials मिळतील त्या आधारे आपण आपले तयार झालेले अकाऊंट पाहू शकता.
DigiMail Open करून आपण आपला CSC ID व CSC Password (Digital Seva Credentials) पाहू शकता.या DigiMail मध्ये आपणाला सीएससी च्या विविध कार्यक्रमाची माहिती मेल च्या आधारे मिळत जाईल.
CSC नोंदणी ज्यांचे Review मध्ये आहे त्यांनी जिल्हा समन्वयकला (District Coordinator) संपर्क करा आणि आपल्या शॉपचे अगोदर Physical verification करून घ्यावे तरच CSC आयडी- पासवर्ड मिळेल.