आपण या लेखामध्ये घरबसल्या नवीन रेशनकार्डसाठी (Ration Card) ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत. समाजातील प्रत्येक व्यक्तीला रेशनकार्ड हे आधार म्हणून समजले जाते. जसे आपल्याला आता पॅनकार्ड व आधार कार्ड महत्वाचे आहे तितकेच रेशनकार्ड (Ration Card) महत्वाचे असते, कारण प्रत्येक सरकारी कामांसाठी आपल्याला रेशनकार्ड ची गरज असते.
पण आपल्याकडे जर अजूनही रेशन कार्ड नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही, कारण आता रेशन कार्ड तयार करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कारण असे की,आता घरबसल्या ऑनलाईन रेशन कार्ड (Ration Card) बनवता येणार आहे. यामुळे तुमच्या अमुल्य वेळेची देखील बचत होणार आहे.
नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस – Apply Online for Ration Card:
नवीन रेशनकार्डसाठी (Ration Card) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम खालील “अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण” विभागाची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
👉 https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन झाल्यावर “ऑनलाईन सेवा” या बॉक्स मध्ये “ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक करा.
“ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली” या लिंक वर क्लिक केल्यावर एक RCMS ची वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये “Sign In/Register” या मेनू मध्ये “Public Login” या पर्यायावर क्लिक करा.
रेशन कार्ड (Ration Card) आणि एफपीएस / केरोसीन परवाना सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी या पोर्टलसह आपले प्रोफाइल तयार करा. नवीन प्रोफाइल तयार करण्यासाठी “नवीन यूजर” या पर्यायावरती क्लिक करा.
नवीन यूजर” या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर “Register New HOFN User” हे पेज ओपन होईल तेथे “No Ration card” या पर्यायावर क्लिक करा.
नवीन एचओएफएन वापरकर्त्याची नोंदणी करताना अर्जदाराचे स्थानिक भाषेत नाव, पूर्ण नाव (आधार कार्ड नुसार), आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, जन्म तारीख, लिंग, आणि कॅप्चा कोड आणि रजिस्टर मोबाईलवर जो ओटीपी येईल तो टाकून “Verify Aadhar” वर क्लिक करा.
आधार व्हेरिफाय केल्यानंतर आता नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये उजव्या बाजूला आवश्यक माहिती भरा. यामध्ये आपल्याला Login Id साठी युजरनेम टाका आणि “Check User” क्लिक करा, तिथे जर हिरवी टिक आली तर ते युजरनेम उपलब्ध आहे. नाहीतर दुसरे युजरनेम टाका.
पुढे पासवर्ड टाकून राज्य, जिल्हा, तहसील, गाव आणि Proposed FPS Name मध्ये गावातील एफपीएस नाव, तुमचा पत्ता, पिनकोड, आणि Service Required मध्ये शिधापत्रिकेसाठी अर्ज सिलेक्ट करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर एखादा आपल्या तहसील कार्यलयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मध्ये ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा, उत्पनाचा पुरावा इत्यादी आवश्यक कागदपत्रे आणि कुटुंबप्रमुखाचा फोटो घेऊन व्हेरिफिकेशन करून घ्या.
अर्जाची सद्य स्थिती जाणून घ्या:
आता आपल्याला आपण सबमिट केलेल्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी पुन्हा होम पेज वर येऊन “Public Login” मध्ये “Register User” वर क्लिक करा.
Register User वर क्लिक केल्यानंतर कुटुंब प्रमुख (एनएफएसएनुसार) साइन इन करा, यामध्ये आपण रजिस्टर करताना जे युजरनेम आणि पासवर्ड सेट केला होता तो टाका आणि “Sign In” वर क्लिक करा, तसेच एक ओटीपी येईल तो टाकून “Verify OTP” वर क्लिक करा.
युजर Sign In झाल्यावर आपण आता पाहू शकता आपल्या अर्जाची सद्य स्थिती.
सूचना:- [फक्त एचओएफएन (‘कुटुंबप्रमुख – सर्वात जुनी महिला सदस्य) नव्या / विद्यमान आरसीसाठी प्रणालीमध्ये नोंदणीकृत असेल. जर कुटूंबाकडे कोणतीही महिला सदस्य नसेल (वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर) एचओएफ (कुटुंब प्रमुख – पुरुष सदस्य) नवीन / विद्यमान आरसीसाठी प्रणालीमध्ये नोंदणी करता येईल].
🙋 अधिक माहितीसाठी व नवीन रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
टीप – वरील दिलेली माहिती समजण्यास अडचण येत असेल किंवा ऑनलाईन प्रोसेस करणे तुम्हाला जमत नसेल तर कृपया तुम्ही तुमच्या जवळच्या महा ई सेवा केंद्रात संपर्क साधावा व नवीन रेशन कार्ड साठी अर्ज सादर करावा, धन्यवाद!