Bandhkam Kamgar Kalyankari Yojana 2024 : सर्वांना नमस्कार, आपण या लेखात बांधकाम कामगार कल्याणकारी योजना व बांधकाम कामगार ऑनलाईन (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी कशी करायची? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बांधकाम व इतर बांधकाम कामगार हे सर्वात मोठया असंघटित वर्गात येतात.
कामगारांच्या रोजगार व सेवाशर्तींचे नियमन करण्याच्या उद्देशानें तसेच सुरक्षा, आरोग्य व कल्याणासाठीच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने , भारत सरकारने “इमारत व इतर बांधकाम कामगार”(रोजगार व सेवाशर्ती नियमन ) कायदा १९९६ ची तरतूद केली आहे.या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने “महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार” (रोजगार व सेवा शर्तीचे नियमन) २००७ देखील मंजूर केले.
ह्या कायद्यान्वये महाराष्ट्र शासनानेसुद्धा “महाराष्ट्र बांधकाम व इतर बांधकाम कामगार ( रोजगार व सेवाशर्ती नियमन ) अधिनियम ” पारित केला. ह्या अधिसूचनेनुसार सुरवातीस महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना ५ शासन प्रतिनिधी नेमून करण्यात आली. मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी (Bandhkam Kamgar Kalyankari Yojana) योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
बांधकाम कामगार योजना उद्देश आणि उद्दीष्टे:
ऑनलाइन (Bandhkam Kamgar Yojana Nondani) नोंदणी प्रक्रिया सुलभीकरण.
बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करणे.
लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत सुलभपणा आणणे.
कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
प्रत्येक बांधकाम कामगाराला एकमेव नोंदणी क्रमांक देणे.
नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
बांधकाम कामगार कल्याणकारी योजना – Bandhkam Kamgar Kalyankari Yojana 2024-25 :
1.सामाजिक सुरक्षा योजना:
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु ३०,०००/
- माध्यान्ह भोजन योजना
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
- आवश्यक अवजारे खरेदीसाठी रु. ५०००/
- प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
- सुरक्षा संच पुरवणे
- अत्यावश्यक संच पुरवणे
2.शैक्षणिक योजना:
- इयत्ता १ ते ७ विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २५००/
- इयत्ता ८ ते १० विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. ५०००/
- इयत्ता १० ते १२ विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. १०,०००/
- पदवी विध्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी रु. २०,०००/
- वैद्यकीय पदवी विध्यार्थ्यांसाठी रु. १,००,०००/
- अभियांत्रिकी पदवी विध्यार्थ्यांसाठी रु ६०,०००/
- पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २०,०००/
- पदव्युत्तर पदविकेमध्ये प्रतिवर्षी रु २५,०००/
- MSCIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
3.आरोग्यविषयक योजना:
- नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/
- शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी २०,०००/
- गंभीर आजाराच्या उपचारार्थ १,००,०००/
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत १,००,०००/ मुदत ठेव
- कायमचे अपंगत्व आल्यास रु. २,००,०००/
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी करणे
4.आर्थिक योजना:
- कामगार कामावर असताना मृत्यू झाल्यास रु. ५,००,०००/(कायदेशीर वारसास)
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु. २,००,०००/(कायदेशीर वारसास)
- अटल बांधकाम कामगार आवास योजना रु. २,००,०००/
- कामगाराचा मृत्यू झाल्यास अंतविधीकरिता रु. १०,०००/
- कामगारराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रु. २४,००००/
- घर खरेदी किंवा घरबांधणी करीता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम रु. ६,००,०००/ अथवा रु. २,००,०००/ अनुदान
बांधकाम कामगार नोंदणी पात्रता निकष:
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे:
- नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- नोंदणी फी- रू. 25/- व 5 वर्षासाठी वार्षिक वर्गणी रू.60/-
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी:
बांधकाम व इतर बांधकाम कार्य म्हणजे याचा संबंध निर्माण करणे, बदलणे, दुरुस्ती करणे, देखभाल करणे किंवा नाश करणे.
कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी – इमारती, रस्त्यावर, रस्ते, रेल्वे, ट्रामवेज, एअरफील्ड, सिंचन, ड्रेनेज, तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह, निर्मिती, पारेषण आणि पॉवर वितरण, पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे तेल आणि गॅसची स्थापना, इलेक्ट्रिक लाईन्स, वायरलेस, रेडिओ, दूरदर्शन, दूरध्वनी, टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,डॅम नद्या, रक्षक, पाणीपुरवठा, टनेल, पुल, पदवीधर, जलविद्युत, पाइपलाइन, टावर्स, कूलिंग टॉवर्स, ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य, दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे., लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे., रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम., गटार व नळजोडणीची कामे., वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे., अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे., वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे., उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे., सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे., लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे., सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम., काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे., कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे., सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे., स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे., सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे., जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे., माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे., रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी., सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
बांधकाम कामगार नोंदणीची ऑनलाईन प्रोसेस – Bandhkam Kamgar Nondani
बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) करण्यासाठी प्रथम खालील लिंक ओपन करा.
https://iwbms.mahabocw.in/registration-and-renewal/registration
बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन झाल्यावर एक विंडो ओपन होईल त्यामध्ये नजीकचे डब्ल्यूएफसी स्थान निवडून आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून “Proceed to Form” या पर्यायावर क्लिक करा.
आता एक “New BOCW Registration” चा ऑनलाईन फॉर्म येईल त्यामध्ये खालील आवश्यक तपशील भरा.
- वैयक्तिक माहिती:
- कायमचा पत्ता
- कौटुंबिक तपशील
- बँक तपशील
- नियोक्ता तपशील
- ९० दिवसांच्या कामकाजाच्या दाखल्याचा तपशील
नंतर फोटो आणि आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करा. तसेच खालील घोषणा पत्र येईल तिथे क्लिक करून फॉर्म सेव्ह करा. नंतर तुम्हाला एक नंबर मिळेल तो नंबर तुमच्या शेजारील कामगार केंद्रात जाऊन द्यावा.
नोट:- ज्या कामगारांना ऑनलाईन करायला अडचण येत असेल तर तुम्ही ऑफलाईन सुद्धा अर्ज करू शकता त्यासाठी खाली दिलेला कामगार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करावा आणि फॉर्म संपूर्ण भरून शेजारील कामगार केंद्र मध्ये जाऊन द्या.
बांधकाम कामगार ऑफलाईन नोंदणी फॉर्म – Bandhkam Kamgar Nondani Form:
बांधकाम कामगार ऑफलाईन (Bandhkam Kamgar Nondani) नोंदणी फॉर्म साठी :- इथे क्लिक करा.