PM Ayushman Bharat Card Registration 2024 :- सर्वांना नमस्कार नागरिकांसाठी आनंदाची बातमी, आता सर्वांना मिळणार ५ लाखापर्यंतचा मोफत उपचार, काय आहे योजना पहा “Ayushman Bharat Health Card” योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.
PM Ayushman Bharat Yojana
प्रधानमंत्री आयुष्मान भारत काय आहे? “Ayushman Card Registration” योजनेअंतर्गत लाभार्थीला ५ लाखापर्यंत मोफत उपचार/दिला जातो. यापूर्वी योजनेचा लाभ हा फक्त निवडक लाभार्थींना दिला जात होता. परंतु आता प्रत्येक व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे.
योजना | प्रधानमंत्री जन आरोग्य योजना |
योजनेची अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |
मिळणारा लाभ | ५ लाखापर्यंतचा विमा |
नोंदणी कुठे करावी? | https://beneficiary.nha.gov.in/ |
यापूर्वी आयुष्मान भारत योजना – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये प्रति कुटुंब आरोग्य सरंक्षण आहे. तसेच महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येक वर्षी १.५ लाख रुपये प्रति कुटुंब आरोग्य सरंक्षण होते. आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून प्रत्येक वर्षी प्रति कुटुंब ५ लाख रुपये आरोग्य संरक्षण करण्यात आले आहे.
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आयुष्मान भारत योजना कार्ड सोबतच आभा कार्ड सुद्धा तयार होणार आहे. आभा कार्ड व प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेचे कार्ड एकत्र मिळणार आहे. योजनेमधून नागरिकांना हॉस्पिटल मधून ५ लाखापर्यंतचा विमा उपलब्ध करून दिला जातो.
Ayushman Bharat Yojana Documents Required
- योजनेचे कार्ड काढण्यासाठी स्वतः व्यक्ती असणे गरजेचे आहे.
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर
- रेशन कार्ड
Ayushman Card Registration Online
आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिक मोबाईलवरून नोंदणी “आयुष्मान भारत योजना रजिस्ट्रेशन ऑनलाईन” करू शकतात. मोबाईल वरून नोंदणी करण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या पोर्टल वरती नोंदणी करू शकतात. (beneficiary nha gov in login) मोबाईल वरून नोंदणी करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.

Ayushman Bharat Card Apply
आधार कार्डला मोबाईलनंबर लिंक नसेल तर आपण जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावून आपले कार्ड बनवू शकता. सर्व प्रथम कार्ड बनविण्यापूर्वी केवायसी करावी लागते. म्हणजेच लाभार्थी व्यक्तीचा फोटो व इतर माहिती भरावी लागते. केवायसी पूर्ण झाल्यांनतर एक रेफरन्स नंबर (Reference Number) मिळेल त्यावरून आपण स्टेटस चेक करू शकता.
केवायसी सबमिट केल्यानंतर काही वेळातच आपले कार्ड Approved होईल. कार्ड डाउनलोड करण्यासाठी पुन्हा वरील वेबसाईट वरती लॉगइन करावे लागेल. लाभार्थीच्या नावासमोर डाउनलोड ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून कार्ड डाउनलोड करण्यासाठी आधार वेरीफाय करण्यासाठी पर्याय येईल.
आधार कार्ड वेरीफाय केल्यानंतर पुन्हा तुम्हाला डाउनलोड पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करून कार्ड डाऊनलोड करता येईल. तसेच नवीन सादास्याचे नाव जोडण्यासाठी त्याठिकाणी एक (Add Family Member) हा पर्याय दिसेल. त्यावरती क्लिक करून आपण कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव जोडू शकता.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतो का?
हो, आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नवीन नोंदणी करू शकतात.
आयुष्मान कार्ड बनविण्याची वेबसाईट कोणती आहे?
या लेखामध्ये योजनेची संपूर्ण माहिती व नोंदणी करण्यासाठीची वेबसाईट याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.
यादीमध्ये नाव नसेल तर नोंदणी करू शकतो का?
आयुष्मान भारत योजनेच्या लिस्ट मध्ये नाव नसेल तरी सुद्धा आपण नोंदणी करू शकता.
मोबाईल वरून नोंदणी करू शकतो का?
मोबाईल वरून आयुष्मान भारत योजनेसाठी आपल्याला नोंदणी करता येईल.
कुटुंबातील नवीन व्यक्तीचे नाव योजनेमध्ये जोडता येईल का?
योजनेमध्ये कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव आपण जोडू शकता.
आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर कार्ड कसे काढावे?
जर मोबाईल नंबर लिंक नसेल सीएससी केंद्र (CSC), आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावून आपण योजनेचे कार्ड बनवू शकता.