sudhir mungantiwar gives big statement on ladki bahin yojana :- सर्वांना नमस्कार, राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केल्याचं समोर आलंय. लोकसभेत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्याची तरतूद करण्यात आलीय.
महायुतीला मिळालेल्या बहुमतात लाडकी बहीण योजनेने महत्त्वाची भूमिका बजावलीय. महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर महिलांना 1500 रुपयांमध्ये वाढ करून 2100 रुपये दिले जातील, असं वचन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. यावर आता भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांन मोठी प्रतिक्रिया दिलीय.
👉 सुधीर मुनगंटीवारांनी योजनेचे पैसे 1500 की 2100 नक्की कधी मिळणार हे स्पष्ट केलेला थेट Video पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या पैशांमध्ये शंभर टक्के वाढ होईल. जर आम्ही 1500 रुपयांचे 2100 केले नाहीत, तर देशातील निवडणुकांमध्ये वेगळा मेसेज जाईल. आम्ही आमचं वचन पूर्ण केलं नाही, अशी चर्चा संपूर्ण देशात सुरु होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आम्हाला हे वचन सत्यात उतरवायचं आहे. आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणेला निश्चितपणे पूर्ण करू.
👉 सुधीर मुनगंटीवारांनी योजनेचे पैसे 1500 की 2100 नक्की कधी मिळणार हे स्पष्ट केलेला थेट Video पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा
मुनगंटीवार पुढे म्हणाले, राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं. आता ही वाढवलेली रक्कम कधीपर्यंत दिली जाईल, हे सरकारला निश्चित करावं लागेल. जानेवारी की जुलै महिन्यात रक्कम वाढवली जाईल, याबाबत निर्णय घेतला जाईल. आम्ही भाऊबीजेपासून योजनेची सुरुवाती केली होती.
📢 ही माहिती तर नक्की वाचा :- खुशखबर..! डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात 6100 रुपये येणार; लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार? – इथे आत्ताच पहा..,
📢 ही माहिती पण नक्की वाचा :- लाडकी बहिण योजना सरकारचा मोठा निर्णय : आत्ता 2100 रुपये मिळणार, पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल, इथे पहा तुम्हाला मिळेल का पैसे..,
📢 ही माहिती वाचा :- लाडकी बहीण योजना अपात्रात यादी जाहीर : या महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे सरकार परत घेणार; इथे लगेच अर्जाची स्थिती पहा, नाहीतर….,
सरकारी तिजोरीवर किती रुपयांचा भार ?
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर 45 हजार कोटी रुपयांचा भार आला आहे. जर अतिरिक्त 500 कोटी रुपये दिले, तर सरकारी तिजोरीवर किती भार येईल? या प्रश्नाचं उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, ही रक्कम आमच्याकडून यावर देण्यात येणाऱ्या व्याज्यापेक्षाही कमी आहे. दरवर्षी आम्ही सातव्या वेतन आयोगात जेवढे खर्च करतो, हा खर्च लाडकी बहीण योजनेच्या खर्चापेक्षाही कमी आहे. महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे, मग लोकं असे सवाल उपस्थित का करत आहेत.
🔔 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी :- येथे क्लिक करा